न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी विजय माल्या याला ४ मासांच्या कारावासाची शिक्षा
नवी देहली – भारतातील बँकांची सहस्रो कोटी रुपयांची फसवणूक करून विदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्या याला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी ४ मासांच्या कारावासाची, तसेच २ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. माल्या याने कुटुंबियांना पाठवलेले ४० दशलक्ष डॉलर्सही (३१ कोटी ७५ लाख ४२ सहस्र रुपये) परत करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
#BREAKING Supreme Court sentences Vijay Mallya to 4 months imprisonment and fine of Rs 2000 for contempt of court. https://t.co/nF3Vv4k1mL
— Live Law (@LiveLawIndia) July 11, 2022