गोरक्षण करण्यासाठी बेरोजगारांना गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देणार !
|
देहराडून (उत्तराखंड) – येथील भाजप शासनाने ‘ग्राम गोरक्षण समित्या’ स्थापन करण्याची योजना बनवली आहे. या समित्यांमधील प्रत्येक सदस्याला बेवारस गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक सदस्याला प्रतिमास ५ सहस्र रुपये वेतनही देण्यात येईल. या योजनेसाठी पुढील ६ मासांसाठी १ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. याचा लाभ किमान ५० गावांतील बेरोजगारांना होऊ शकणार आहे. राज्याचे पशुपालन मंत्री सौरभ बहुगुणा यांनी ही माहिती दिली.
बहुगुणा म्हणाले की,
१. बेवारस पशूंच्या संरक्षणासाठीची वार्षिक तरतूद अडीच कोटींवरून १५ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२. उत्तरप्रदेश शासनाच्या निर्णयानुसारच आम्हीही प्रत्येक गायीच्या चार्यासाठीचा प्रतिदिनचा खर्च ६ रुपयांवरून ३० रुपये केला आहे.
३. ग्राम गोरक्षण समित्यांच्या सदस्यांना ‘गोरक्षक’ म्हणून संबोधण्यात येईल. प्रत्येकाकडे ४-५ गायींचे दायित्व दिले जाईल.
संपादकीय भूमिकाउत्तराखंडमधील पुष्कर सिंह धामी शासनाचे अभिनंदन ! गोमाता सर्वार्थाने महत्त्वाची असल्याने अन्य भाजपशासित राज्यांनीही गायींचे रक्षण करण्यासाठी शासकीय स्तरावर अशी योजना राबवणे आवश्यक ! |