हिंगोली येथील पूरग्रस्तांना अन्न न दिल्याने खासदारांनी तहसीलदारांना खडसावले !

पूरग्रस्त गावकरी आणि  शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील

हिंगोली –जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आलेल्या पुरामुळे लोकांना हालाखीचा सामना करावा लागत आहे. झालेल्या हानीचे पंचनामे चालू केले आहेत; मात्र पुरामुळे अनेक घरातील अन्नधान्य वाहून गेले आहे, तसेच उपलब्ध असलेले अन्न शिजवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. प्रशासन साहाय्य पोचवेल, अशी गावकर्‍यांची अपेक्षा होती; मात्र उपाशी असलेल्या नागरिकांना प्रशासनाने तात्काळ जेवणाची व्यवस्था केली नाही. त्यामुळे येथील शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी संतप्त होऊन तहसीलदारांना संपर्क करून खडसावले.

गावातील सरपंच राजेश इंगोले आणि त्यांच्या पथकाने तात्काळ पूरग्रस्त नागरिकांना जेवण दिले. हेमंत पाटील यांनी गावांमध्ये तात्काळ अन्नधान्याचे किट पाठवण्याच्या सूचनाही तहसीलदारांना दिल्या. त्यानंतर १० जुलै या दिवशी प्रशासनाच्या वतीने अन्नधान्याची व्यवस्था करण्याचे काम चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • असंवेदनशील प्रशासन !

  • पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यावरही संवेदनशीलता न दाखवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा कधी करणार ?