येरवडा कारागृहातून रजेवर गेलेला धर्मांध आरोपी पसार !
ठाणे, १० जुलै (वार्ता.) – येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना कोरोना महामारीच्या काळात आपत्कालीन अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. याचाच लाभ घेत भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील आरोपी महंमद सद्दाम शफीक शेख उपाख्य लस्सीवाला रजा संपल्यावर पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी आला नाही. तो पसार झाल्याची तक्रार पुणे येथील कारागृह पोलिसांनी नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने या सुविधेमध्ये काही सयुक्तिक पालट करायला हवा का, याचा कारागृह प्रशासनाने विचार करावा ! |