गेवराई (जिल्हा बीड) येथील सरकारी भूमीवर मंदिर किंवा मशीद बांधकामासाठी अनुमती देऊ नये !

गेवराई शहरातील नागरिकांची मागणी

गेवराई पोलीस ठाणे येथे निवेदन देतांना नागरिक

गेवराई (जिल्हा बीड), १० जुलै (वार्ता.) – येथील सरकारी जागेवर मंदिर किंवा मशीद यांच्या बांधकामासाठी अनुमती देण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन येथील तहसील कार्यालय आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, येथील पोलीस ठाण्याच्या उत्तर बाजूस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानाच्या दक्षिण बाजूला असलेल्या सरकारी भूमीवर काही हिंदू आणि मुसलमान अनुक्रमे मंदिर अन् मशीद बांधण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र कोणत्याही नागरिकांना मंदिर, मशीद किंवा दर्गा बांधण्यास अनुमती देण्यात येऊ नये. सरकारी भूमीवर विनाअनुमती बांधकाम केल्यास हिंदु नागरिक असो किंवा मुसलमान नागरिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.