महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून लाच घेणार्या कारागृहातील ८२ कर्मचार्यांवर गुन्हा नोंद
देहलीच्या रोहिणी कारागृहातील कर्मचार्यांना प्रतिमहा मिळत होती दीड कोटी रुपयांची लाच !
नवी देहली – महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून प्रतिमास दीड कोटी रुपयांची लाच घेण्याच्या प्रकरणी येथील रोहिणी कारागृहातील ८२ कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी यांतील ८ अधिकार्यांना अटक करण्यात आली आहे. या लाचेच्या बदल्यात सुकेश याला कारागृहात भ्रमणभाषचा वापर करणे, तसेच अन्य सुविधा पुरवल्या जात होत्या. २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी सुकेश याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी तिहार कारागृहात असतांनाही तो कारागृह प्रशासनाची सुरक्षा भेदून कारवाया करत होता.
संपादकीय भूमिकाराजधानी देहलीतील एका कारागृहात ही स्थिती आहे, तर देशातील अन्य कारागृहांत काय चालू असेल, हे यातून लक्षात येते ! |