औंध (पुणे) रुग्णालयातील जिल्हा चिकित्सक कनकवळे यांच्यासह तिघांना लाच घेतांना अटक !
पुणे – सोनोग्राफी केंद्राचा नूतनीकरण परवाना देण्यासाठी औंध रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी महादेव गिरी, जिल्हा शल्य चिकित्सक आधुनिक वैद्य माधव कनकवळे आणि साहाय्यक अधीक्षक (लिपिक संवर्ग) संजय कडाळे या तिघांना १२ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असून त्यांच्या विरोधात औंध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला आहे. याविषयी २५ वर्षीय तक्रारदार यांचे शिक्रापूर येथे सोनोग्राफी केंद्र आहे.
सोनोग्राफी केंद्राचा परवाना नूतनीकरण करण्यासाठीची सर्व कागदपत्रे संबंधित रुग्णालयाकडे दिली होती. तरीही आधुनिक वैद्य कनकवळे, गिरी आणि कडाळे यांनी संगनमत करून संबंधित व्यक्तीकडे ४० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १२ सहस्र रुपये देण्याचे निश्चित झाले होते.
संपादकीय भूमिकाअशा लाचखोरांना कठोर शिक्षाच हवी ! |