डोंबिवली येथे घरफोड्या आणि चोरी करणार्या ३ आरोपींना अटक !
ठाणे, १० जुलै (वार्ता.) – डोंबिवली परिसरात येऊन घरफोड्या करून सोने आणि किमती ऐवज चोरणार्या अभिजित अलोक रॉय (वय ३६ वर्षे) याला मुंबई येथील कामाठीपुरा भागातून येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य चोरीच्या गुन्ह्यात इम्रान अबलेश खान (वय २५ वर्षे) आणि रियाज रमजान खान (वय ३६ वर्षे) यांना टिळकनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाणारे अमित झोपे यांच्या घरातून १०० तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे. (गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्याविना त्यांना कायद्याचे भय वाटणार नाही. – संपादक)