मुसलमान स्मशानभूमीतील अवैध बांधकाम थांबवा ! – शिवबाराजे प्रतिष्ठान
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १० जुलै (वार्ता.) – येथील मौजे तुळजापूर घाटशीळ रस्ता येथील मुसलमान स्मशानभूमीमध्ये करण्यात येणारे अवैध बांधकाम थांबवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन ‘शिवबाराजे प्रतिष्ठान’च्या वतीने मुख्याधिकार्यांच्या नावे नगर परिषद येथे दिले.