सोलापूर येथील पाटस पथकर नाक्यावर वारकर्यांकडून पथकर वसुली : ४ जणांवर गुन्हा नोंद !
सोलापूर – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस येथील ‘टोल प्लाझा’ आस्थापनाकडून आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणार्या वारकर्यांकडून पथकर आकारल्याच्या प्रकरणी आस्थापनाचे ‘प्रोजेक्ट मॅनेजर’ अजयसिंह ठाकूर, पथकर वसुली कर्मचारी बालाजी वाघमोडे, सुनील थोरात आणि विकास दिवेकर या चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘वारकर्यांना पथकर सवलत देण्यात यावी’, या शासनाने काढलेल्या परिपत्रकाचे उल्लंघन ‘पाटस टोल प्लाझा’ आस्थापनाकडून करण्यात आल्याने यवत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तक्रार दिली आहे. (पथकर नाक्यांवर कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून अरेरावी आणि बळजोरी केल्याच्या तक्रारी येतात. वारीच्या निमित्ताने पथकरात सवलत दिलेली असतांनाही बळजोरीने पथकर आकारणार्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, म्हणजे कुणी असे धाडस करणार नाही ! – संपादक)