सामाजिक माध्यमांवर जिहादी आतंकवादी संघटनांची सहस्रावधी खाती !
|
नवी देहली – ‘ब्रुकिंग सेंटर फॉर मिडिल ईस्ट पॉलिसी’च्या अहवालानुसार, इस्लामिक स्टेटची ट्विटरवर अनुमाने ७० सहस्र खाती असून प्रत्येकाचे १ सहस्र ‘फॉलोअर्स’ (समर्थक) आहेत. यातून कोट्यवधी लोक एकट्या इस्लामिक स्टेटशी जोडले गेले आहेत, हे स्पष्ट होते. तसेच वर्ष २०१८ मधील एका संशोधन अहवालानुसार फेसबूकवर इस्लामिक स्टेटची ९६ देशांमध्ये एकूण १ सहस्र खाती आहेत. इस्लामिक स्टेटमध्ये ४० टक्के परदेशी आतंकवाद्यांची भरती सामाजिक माध्यमांतूनच झाली आहे. सायबर जगतावर लक्ष ठेवणारी जागतिक स्तरावरील एखादी सामायिक यंत्रणा नाही. त्यामुळे विविध देशांमधील छोट्या-मोठ्या आतंकवादी संघटनांना आंतरराष्ट्रीय आंतकवादी संघटनांशी संपर्क साधणे सहज शक्य होते.
१. ‘जागतिक आतंकवाद निर्देशांक २०२२’नुसार जगभरात वर्ष २०२१ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणांमध्ये २९ टक्के बळींसाठी केवळ इस्लामिक स्टेट उत्तरदायी आहे.
२. तालिबानही भ्रमणभाषवर बाँबस्फोटांचे व्हिडिओ बनवून ट्विटरवर अपलोड करतात. त्याद्वारे भरती आणि निधी जमवण्याचे काम केले जाते. ‘यूके टाइम्स’च्या अहवालानुसार यू ट्यूब, फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम या माध्यमांवर व्हिडिओ अपलोड करून ‘मर्सिडीज’सारख्या मोठ्या आस्थापनांची विज्ञापने मिळवून त्याद्वारे तालिबानी प्रतिमहा कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत.
३. आतंकवादी संघटनांना पैसा पुरवणारा हज्जाज फहद अल आझमी याने तर ट्विटरवरच त्याच्या १७ लाख फॉलोअर्सकडे आतंकवादी कारवायांसाठी निधी देण्याचे आवाहन केले होते.
४. फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिकी आस्थापन ‘ब्लॅकबर्ड’ने केलेल्या अभ्यासानुसार ४७ भाषांमध्ये एकूण ९ लाख २७ सहस्र ९०८ ट्वीट्स आतंकवादी कारवायांना उत्तेजन देण्यासाठी करण्यात आल्या होत्या.
५. मार्च २०१९ मध्ये न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च येथे ५१ नागरिकांच्या हत्येच्या घटनेचे फेसबूकवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. तसेच गेल्या मासात उदयपूर येथे कन्हैयालाल यांचा शिरच्छेद करतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करून लोकांना भडकावण्याचा प्रयत्न झाला.
संपादकीय भूमिका
|