तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील मशिदीवरील भोंगे बंद करण्यात यावेत !
‘शिवबाराजे प्रतिष्ठान’च्या वतीने तहसील कार्यालयाला निवेदन
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), ९ जुलै (वार्ता.) – शहरामध्ये असलेल्या मशिदीवरील भोंग्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत आहे. त्यामुळे भोंगे बंद करण्याविषयी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, तसेच तुळजापूर खुर्द येथील सभागृहावरील ‘मशीद’ हे नाव हटवण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन ७ जुलै या दिवशी ‘शिवबाराजे प्रतिष्ठान’च्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले. (अशा मागण्या का कराव्या लागतात ? पोलीस आणि प्रशासन यांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
निवेदनात म्हटले आहे की, मशीद आणि मदरसा या ठिकाणी चिकित्सालये, शाळा, प्रशासकीय कार्यालय असल्याने भोंग्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि रहिवासी यांना त्याचा त्रास होत आहे. तुळजापूर खुर्द येथे नगर परिषद अंतर्गत प्राधिकरणातून अल्पसंख्यांकांना सभागृह बांधून दिले आहे. सदर सभागृह हे हिंदु आणि मुसलमान दोन्ही समाजातील अल्पसंख्यांकांसाठी बांधण्यात आलेले असतांना त्या सभागृहाला ‘मशीद’ हे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे सभागृह ‘मशीद’ आहे कि अल्पसंख्यांकांचे सभागृह, याचा बोध होत नाही. त्यामुळे सभागृहावरील ‘मशीद’ हे नाव तात्काळ हटवण्यात यावे. (हा मुसलमानांच्या लांगूलचालनाचाच प्रकार आहे. असे नाव दिल्याविषयी संबंधितांची चौकशी होणे आवश्यक आहे. – संपादक)