संगीताच्या संदर्भातील लेखमालेत ‘भावनागीत’, असा शब्दप्रयोग करण्यामागील कारण
‘भारतीय संगीतामध्ये ‘शास्त्रीय संगीत’ आणि ‘सुगम संगीत’ असे प्रकार आहेत. सुगम संगीतात विविध भावना प्रकट करणार्या गीतांचा समावेश असतो. भावगीत, भक्तीगीत, गझल, चित्रपट गीत इत्यादी सुगम संगीताची उदाहरणे आहेत. ‘मराठीत प्रेम, विरह आणि अन्य प्रकारच्या भावना प्रकट करणार्या गीतांना ‘भावगीत’ म्हणण्याची प्रथा रूढ आहे. आध्यात्मिकदृष्ट्या ‘भाव’ आणि ‘भावना’ वेगवेगळ्या आहेत. जो ईश्वराशी अनुसंधान साधण्यास साहाय्य करतो तो ‘भाव.’ त्यामुळे ईश्वराचे, तसेच गुरूंचे स्मरण होऊन भावजागृती करणार्या गीतांना ‘भावगीत’ म्हणजे योग्य आहे. याउलट वर्तमानकाळातील प्रचलित भावगीतांमध्ये देवाचा उल्लेख नसून व्यक्तीचे रूप, निसर्ग यांचा किंवा प्रेम, विरह अशा भावनांचा उल्लेख असतो. त्यामुळे अशा गीतांना ‘भावगीत’ न म्हणता ‘भावनागीत’ म्हणणे अधिक योग्य ठरते. त्यामुळे यापुढे संगीताच्या संदर्भातील लेखमालेत जेथे प्रचलित ‘भावगीत’ शब्द असेल, त्या ठिकाणी ‘भावगीता’ऐवजी ‘भावनागीत’ हा शब्द वापरण्यात येणार आहे.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.६.२०२२)