‘के.पी.कराटे क्लास’च्या वतीने आरग (जिल्हा सांगली) येथे महिलांना साडी वाटप !
मिरज, २ जुलै (वार्ता.) – ‘के.पी.कराटे क्लास’च्या वतीने आरग (जिल्हा सांगली) येथे श्री अंबाबाईदेवीच्या यात्रेच्या निमित्ताने उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत २६० विधवा आणि गरजू महिला यांना साडी वाटप करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष कलगोंडा पाटील यांनी याचे आयोजन केले होते. या वेळी सांगली शहर शिवसेना अध्यक्ष श्री. महेंद्र चंडाळे, सौ. ज्योती चंडाळे, माजी पंचायत समिती सभापती सौ. सुनीता पाटील यांच्यासह अमोल वडगावे, प्रदीप शहा, सुभाष खोत, कलगौंडा प-सलगे, बापू कोष्टी, तसेच ‘के.पी.कराटे क्लास’चे सदस्य उपस्थित होते.