महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून ७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचा दंड !
मध्यप्रदेशातील एका महाविद्यालयाच्या वसतीगृहात हनुमान चालिसाचे सामूहिक पठण
भोपाळ (मध्यप्रदेश) – सीहोर जिल्ह्यातील ‘वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी’च्या वसतीगृहात हनुमान चालिसाचे सामूहिक पठण केल्याने महाविद्यालय प्रशासनाने ७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. अन्य काही विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
या घटनेविषयी महाविद्यालयाच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे की, कुणी वैयक्तिक स्तरावर पूजा किंवा पठण करत असेल, तर ते अयोग्य नाही; मात्र विनाअनुमती कुणी सामूहिकरित्या असे करत असेल, तर ते सहन करता येणार नाही.
VIT Bhopal: 7 Hindu students penalised for reciting Hanuman Chalisa. Here is what we know so farhttps://t.co/IeL7DAhMHb
— OpIndia.com (@OpIndia_com) July 8, 2022
हनुमान चालिसा भारतात म्हणणार नाही, तर कुठे म्हणणार ? – गृहमंत्री नरोत्तम मिश्रा
राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेची गंभीर नोंद घेतली असून याची चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांना दिला. ते म्हणाले की, हनुमान चालिसा भारतात म्हणणार नाही, तर कुठे म्हणणार ?
संपादकीय भूमिकाजर येथे सामूहिक नमाजपठण करण्यात आले असते, तर महाविद्यालय प्रशासनाने अशीच कारवाई केली असती का ? |