व्याख्यानाच्या माध्यमातून ‘श्री भवानीदेवीची शक्ती संपूर्ण महाराष्ट्रात प्रक्षेपित होत आहे’, असा भावप्रयोग घेतल्यावर ‘इंटरनेट’ची अडचण दूर होऊन बोलणे सर्वांपर्यंत पोचणे !
‘सोलापूर येथील महिला शौर्यजागृती व्याख्यानाच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व प्रशिक्षक नियोजन करण्यासाठी एकत्र जमलो होतो. त्या वेळी सर्वांनाच ‘इंटरनेट’ची पुष्कळ अडचण येत होती. काही जणांचा आवाजही येत नव्हता. तेव्हा ‘श्री भवानीदेवीची शक्ती शौर्यजागृती व्याख्यानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रक्षेपित होत आहे’, अशा आशयाचा भावप्रयोग घेतला. त्या वेळी वातावरणात शांतता पसरली आणि मी बोलत असतांना ‘इंटरनेट’चा अडथळा आला नाही. या वेळी ‘श्री भवानीदेवीने तिच्या कृपेची साक्षच दिली’, असे मला वाटले.’
– कु. शिवलीला गुब्याड, सोलापूर (१२.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |