अयोध्येत मुसलमानाच्या घरातील फटाक्यांच्या साठ्याचा स्फोट : एक जण घायाळ
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील हैरिंग्टनगंजमध्ये समीउल्लाह याच्या घरात ठेवण्यात आलेल्या फटाक्यांच्या साठ्याचा स्फोट होऊन यात एक तरुण घायाळ झाला. स्फोटामुळे हे घर कोसळले. पोलिसांनी घटनास्थळावरून फटाके बनवण्यासाठी वापरण्यात येणारी ९ पोती स्फोटके जप्त केली आहेत.