कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे ४० माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी !
ठाणे, ८ जुलै (वार्ता.) – ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे सुमारे ४० हून अधिक नगरसेवक ७ जुलैच्या मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी आले. या नगरसेवकांसमवेतच्या १ घंट्याच्या बैठकीनंतर नगरसेवकांनी आम्ही शिंदे गटात सहभागी होत असल्याचे घोषित केले.