आमच्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी थेट रणांगणात उतरा ! – पुतिन यांचे पाश्चात्त्य देशांना आव्हान
मॉस्को – आमच्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी थेट रणांगणात उतरा, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना आव्हान दिले. मागील ४ मासांपासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. अनेक पाश्चात्त्य देशांनी स्वतः युद्धात सहभागी न होता युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी, ‘युक्रेनला पाठिंबा द्यायचा असेल, तर थेट आमच्या विरोधात रणांगणात उतरा’, असे आव्हान दिले आहे.
President Vladimir Putin said that Russia had barely got started in Ukraine and dared the West to try to defeat it on the battlefield.#RussiaUkraineWar https://t.co/hbyPbIPXi9
— IndiaToday (@IndiaToday) July 8, 2022
पुतिन यांनी ७ जुलै या दिवशी मॉस्को येथे खासदारांची एक बैठक घेतली. त्यात युद्धाचा आढावा घेण्यात आला. पुतिन यांनी युक्रेनच्या जनतेप्रती संवेदनाही दाखवली. ते म्हणाले, ‘‘पाश्चात्त्य देश स्वतः युद्धात सहभागी न होता युक्रेनच्या जनतेला लढण्यासाठी पुढे करत आहेत. आमचा शांततेला विरोध नाही; पण काही देशांच्या हस्तक्षेपामुळे शांतता प्रस्थापित करणे अवघड होत असल्याचे लक्षात घ्यावे.’’