संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांना आडवे करू ! – संजय शिरसाट, आमदार
संभाजीनगर – ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील हे औरंगाबादचे बादशहा आहेत का ? ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ नामांतर करतांना त्यांच्यासारखे कितीही आडवे आले, तरी त्यांना आडवे करू. त्यात कोणतेही दुमत नाही. कार्यवाही झाल्याचे शहरवासियांना एका मासात दिसेल, असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाट यांनी ७ जुलै या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.