बकरी ईदसाठी अधिकृत पशूवधगृहाचा वापर करा !
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
सोलापूर, ७ जुलै (वार्ता.) – यावर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हा सण एकाच दिवशी म्हणजे १० जुलै २०२२ या दिवशी आहे. मुसलमान बांधवांनी कुर्बानीसाठी अधिकृत पशूवधगृहाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. बकरी ईद समन्वय समितीच्या बैठकीत मिलिंद शंभरकर बोलत होते. या वेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. एन्.ए. सोनवणे, पशूधन विकास अधिकारी नवनाथ नरळे, प्रदूषण नियंत्रणचे किरण चव्हाण, नगरपालिकेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
शंभरकर यांनी सांगितले की, ‘मुंबई उच्च न्यायालयाने अधिकृत पशूवधगृहांव्यतिरिक्त पशूंची हत्या करू नये’, असे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे सर्वांनी पालन करावे. महापालिका, नगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कुर्बानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पंढरपूर, अकलूज, मंगळवेढा परिसरातील नागरिक हे १२ जुलै या दिवशी घरगुती पद्धतीने ईद साजरी करणार आहेत. त्या पद्धतीने अन्यांनी करावे. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
संपादकीय भूमिकाअवैध पशूवधगृहांना अभय दिल्यामुळेच असे आवाहन करावे लागते ! |