‘फ्लेमिंगो’च्या १२ पैकी १० लोखंडी प्रतिकृतींची चोरी !
नवी मुंबई – येथे खाडीच्या किनारी ‘फ्लेमिंगो’ (पक्षी) आढळतात. त्यांचे शहरातील वास्तव्य लक्षात येण्यासाठी महापालिकेने ‘फ्लेमिंगो’च्या १२ लोखंडी प्रतिकृती सिद्ध केल्या होत्या; पण त्यातील १० प्रतिकृती चोरीला गेल्या आहेत. आता तेथे केवळ २ प्रतिकृतीच उरल्या आहेत.