हिंदूंना अल्पसंख्यांक करण्याचा प्रयत्न ख्रिस्ती मिशनरी करत आहेत ! – श्रीमती एस्थर धनराज, सहयोगी संचालक, भगवद्गीता फाऊंडेशन फॉर वैदिक स्टडीज, तेलंगाणा
भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासून ते आतापर्यंत ख्रिस्ती मिशनऱ्यांनी स्थापन केलेल्या कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतर करणे, हे एकच लक्ष्य राहिले आहे. हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतर करून ख्रिस्ती लोकसंख्या वाढवणे, हिंदूंना अल्पसंख्यांक करणे, अशी केरळसारखी स्थिती देशामध्ये करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.