केरळमध्ये येशू ख्रिस्ताविषयी अपमानास्पद टिप्पणी करणार्या मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंद
(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)
कोच्चि (केरळ) – येशू ख्रिस्ताविषयी अपमानास्पद टिप्पणी करून ख्रिस्त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी केरळच्या मलप्पूरम् जिल्ह्यातील कोंडोट्टी येथील रहिवासी असलेले मौलवी वसीम अल् हिकामी यांच्या विरोधात कोच्चि सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. भाजपचे नेते अनूप अँथनी यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘मौलवी वसीम अल् हिकामी यांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी अवमानकारक विधान केले. त्यांच्या या विधानामुळे ख्रिस्त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या’, असे अॅन्टनी यांनी तक्रारीत म्हटले आहे. यापूर्वी जानेवारी २०२२ मध्ये वसीम अल् हिकामी यांच्या विरोधात अशाच प्रकारच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता.
Kerala: Muslim cleric Waseem Al Hikami booked for passing derogatory remarks against Jesus Christ on social media, was booked earlier in January toohttps://t.co/C2HVRj6VFl
— OpIndia.com (@OpIndia_com) July 6, 2022
संपादकीय भूमिकासाम्यवाद्यांच्या राज्यात ख्रिस्ती किंवा मुसलमान यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर तेथील पोलीस तात्काळ त्याची नोंद घेतात; मात्र हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या ! |