‘काली’ माहितीपटातील भित्तीपत्रकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून ऑनलाइन स्वाक्षरी अभियान
२४ घंट्यांत ४ सहस्र हिंदूंकडून स्वाक्षरी
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
मुंबई – ‘काली’ माहितीपटातील भित्तीपत्रकाच्या विरोधात आणि याच्या निर्मात्या लीना मणीमेकलई यांच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून ऑनलाइन स्वाक्षरी अभियान राबवण्यात येत आहे. यानंतर याचे निवेदन केंद्र सरकारला देण्यात येणार आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या २४ घंट्यांत ४ सहस्र हिंदूंनी स्वाक्षर्या केल्या आहेत. अधिकाधिक हिंदूंनी स्वाक्षरी करावी, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.
स्वाक्षरी करण्यासाठी लिंक : hindujagruti.org/arrest-leena-manimekalai