चांदूरबाजार (जिल्हा अमरावती) शहराच्या वस्तीत आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत !
अमरावती – ४ जुलैच्या मध्यरात्रीपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चांदूरबाजार शहरासह तालुक्यातील आसपासच्या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धवट असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे स्थानिकांच्या घरात पाणी घुसले. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतातही पाणी शिरले. अनेक गावांतील वीजपुरवठा मध्यरात्रीपासून बंद आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील माधान ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे तेथील नाल्याची अपेक्षित खोली झाली नाही. त्यामुळे नाल्यांवरून पाणी वहात आहे. हैदतपूर वडाळा येथेही नाल्याला आलेल्या पाण्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.