आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी खासदार भावना गवळी यांच्या सहकाऱ्याला जामीन !
मुंबई – आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अटकेत असलेले सईद खान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. सईद खान हे शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे सहकारी आहेत. सईद खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. याच प्रकरणात भावना गवळी यांनाही चौकशीसाठी समन्स बजावले होते.
भावना गवळी या ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा असून खान हे त्याचे संचालक आहेत. प्रतिष्ठानमधून पैशांची अफरातफर करण्यासाठी प्रतिष्ठानला आस्थापनात पालटण्याचे षड्यंत्र रचले गेले, असा दावा संचालनालयाने केला आहे. त्यांनी या संस्थेत १९ कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप संचालनालयाने केला आहे. त्यांची पावणेचार कोटी रुपयांची मालमत्ता कह्यात घेण्यात आली आहे. खान यांना १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यासह जामीन संमत करण्यात आला.