मुख्यमंत्र्यांची मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास भेट
मुंबई, ५ जुलै (वार्ता.) – मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ जुलैला भेट दिली. ते म्हणाले, रेल्वे सेवा बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होऊ शकते. यासाठी उपनगरीय रेल्वे विभाग, बेस्ट, मुंबई महानगरपालिका यांनी समन्वय साधून लोकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.