हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘तिस्ता सेटलवाड यांचा दंगलींशी काय संबंध ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
तिस्ता सेटलवाड यांचे प्रकरण व्यापक असल्याने ते राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावे ! – आर्.व्ही.एस्. मणी, माजी अवर सचिव, केंद्रीय गृहमंत्रालय
मुंबई – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदु समाज यांना कलंकित करण्यासाठी भारतात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत’, असे भासवून तिस्ता सेटलवाड यांनी गुजरात दंगलीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खोटा प्रचार केला. तिस्ता सेटलवाड यांनी हिंदु आतंकवादाचे ‘प्रचार प्रतिनिधी’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केले आहे. काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री यांनी ‘मनीलाँड्रिंग’द्वारे बरेचसे साहाय्य तिस्ता सेटलवाड यांना मिळवून दिले आहे. हे सर्व आता उघड होणार आहे, तसेच आणखीन बरेच काही बाहेर येणार आहे. त्यामुळे तिस्ता सेटलवाड यांनी केवळ न्यायालयाला खोटी माहिती दिली म्हणून तिचे प्रकरण गुजरात ‘ए.टी.एस्.’कडे (आतंकवादविरोधी पथकाकडे) न ठेवता हे प्रकरण व्यापक असल्याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) दिले पाहिजे, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाचे माजी अवर सचिव श्री. आर्.व्ही.एस्. मणी यांनी केली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘तिस्ता सेटलवाड यांचा दंगलींशी काय संबंध ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
श्री. मणी पुढे म्हणाले की,
१. तिस्ता सेटलवाड यांना मनमोहन सरकारने केवळ ८० कोटी रुपये दिले नाहीत, तर त्यासह वेगवेगळ्या मंत्रालयांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवला आहे. त्यातून नक्षलवादाला तसेच, यासिन मलिकसारख्या फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिला जात होता.
२. तिस्ता यांनी अनेक इस्लामी राष्ट्रांकडून सहस्रो कोटी रुपयांचा निधी स्वत:च्या स्वयंसेवी संस्थांसाठी मिळवला.
तिस्ता सेटलवाड यांचा सहकारी रईस पठाण याची सखोल चौकशी करा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास अभ्यासक तथा लेखक
तिस्ता सेटलवाड यांनी ‘सबरंग’ आणि ‘सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस’ यांसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमांतून स्वत:चे दुकानच उघडले आहे. गुजरात दंगलीत मदिनाबीबी या मुसलमान महिलेवर बलात्कार झालेला नसतांना तिच्याकडून खोटे प्रतिज्ञापत्र सिद्ध करून ते न्यायालयात सादर केले. हे नानावटी आयोगासमोर उघड झाले, तसेच तिस्ताकडे काम करणारा तिचा सहकारी रईस पठाण याने तर तिच्यावर गंभीर आरोप करतांना म्हटले आहे की, सोनिया गांधी यांच्याशी तिस्ता सेटलवाड यांची भेट झाली होती. त्या वेळी सोनिया गांधी यांनी ‘त्यांना काम करण्यासाठी सतत पैसे मिळत रहातील’, असे आश्वासन दिले होते. तसेच दुसरीकडे स्वयंसेवी संस्थेला मिळणाऱ्या निधीपैकी २५ टक्के निधी तरी पीडितांसाठी खर्च करण्यास तिस्ताला सांगितले होते. त्यावर तिस्ताने ‘५० टक्के निधी तर दलालच घेतात, तर बाकीचा निधी आम्हालाच लागतो’, असे सांगितले होते. त्यामुळे रईस पठाण यांची सखोल चौकशी केल्यास आणखीन बरेच काही बाहेर येईल.