अखंड गुरुचरणांचा ध्यास असणारी मनीषाताई !
पुणे येथील सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हिची परात्पर गुरुदेवांनी लक्षात आणून दिलेली गुणवैशिष्ट्ये गुरुचरणी अर्पण करते.
अखंड गुरुचरणांचा ध्यास असणारी मनीषाताई ।
गुरुदेवांप्रती उत्कट भक्ती आणि दृढ श्रद्धा असणारी मनीषाताई ।। १ ।।
परिपूर्ण सेवेचा ध्यास असणारी ।
सेवा परिपूर्ण कशी करायची ते साधकांना शिकवणारी ।। २ ।।
प्रत्येक गुरुसेवा भावपूर्ण करणारी ।
सतत नम्र आणि लीन भावात असणारी ।। ३ ।।
साधकांवर प्रेमाचा वर्षाव करणारी ।
सतत इतरांचा विचार करणारी ।। ४ ।।
सर्वांची साधना होण्यासाठी सतत धडपडणारी ।
प्रत्येक जिवावर मनापासून प्रेम करणारी ।। ५ ।।
अंतरी समष्टी सेवेची तीव्र तळमळ असलेली ।
साधकांची आध्यात्मिक आई होऊन आधार देणारी ।। ६ ।।
साधनेत पुढे जाण्यासाठी दिशा देणारी ।
साधनेचे योग्य दृष्टीकोन मनावर बिंबवणारी ।। ७ ।।
स्वतःच्या आचरणातून इतरांना शिकवणारी ।
तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांतहीसतत हसतमुख आणि आनंदी असणारी ।। ८ ।।
सर्वस्वाच्या (टीप १) त्यागाबरोबर ‘स्व’चाही (टीप २) त्याग करण्यासाठी धडपडणारी ।
प्रत्येक प्रसंगात सकारात्मक आणि उपायात्मक रहाणारी ।। ९ ।।
अखंड सेवकभावात राहून झोकून देऊन गुरुसेवा करणारी ।
परमपूज्यच (टीप ३) जिचे सर्वस्व आणि प्राण आहेत अशी मनीषाताई ।। १० ।।
टीप १ : सर्वस्व – तन-मन-धन
टीप २ : ‘स्व’ – कर्तेपणा
टीप ३ : परमपूज्य – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
‘आम्हा सर्व साधकांची आध्यात्मिक आई असलेली आणि अनेक दैवी गुणांनी संपन्न असलेली माझी प्रिय आध्यात्मिक सखी लवकर संतपदी विराजमान होवो’, अशी मी गुरुमाऊलींच्या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.
– सौ. प्रीती संकेत कुलकर्णी, पुणे (२३.२.२०२२)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |