(म्हणे) ‘तुला अधिक दिवस जगू देणार नाही !’
भाजपचे नेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ कपिल मिश्रा यांना जिहाद्याकडून हत्येची धमकी
नवी देहली – भाजपचे देहली येथील नेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ कपिल मिश्रा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मिश्रा यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. मिश्रा यांना अकबर आलम नावाच्या जिहाद्याने ३ जुलैच्या सायंकाळी ई-मेल करून त्यामध्ये ‘आतंकवादी कपिल मिश्रा, तुला अधिक दिवस जगू देणार नाही ! माझ्या माणसांनी तुझ्यावर गोळीबार करण्याचे नियोजन करून ठेवले आहे’, असे लिहिले होते. मिश्रा यांनी या पत्राचे छायाचित्रच ट्वीटमध्ये जोडले आहे.
ऐसी धमकियों से हम ना डरने वाले हैं, ना रुकने वाले हैं
कन्हैया लाल जी, उमेश कोल्हे जी जैसै जिहादी हिंसा के शिकार परिवारों के लिए हमारा अभियान और तेजी से चलेगा
हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) July 4, 2022
मिश्रा यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, अशा धमक्यांना आम्ही न घाबरतो, न आम्ही आमचे कार्य थांबवू ! उदयपूर येथील कन्हैयालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांच्या कुटुंबांना साहाय्य करण्याचे आमचे अभियान अधिक गतीने चालेल. आमच्यासमवेत ‘रघुनाथ’ असतांना आम्हाला कशाची चिंता ! (कपिल मिश्रा यांच्यासारखी ईश्वरावरील अढळ श्रद्धा किती हिंदूंमध्ये आहे ? – संपादक) कपिल मिश्रा यांनी कन्हैयालाल यांच्या कुटुंबाची भेट घेऊन ‘कन्हैयालाल यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करावे’, असे हिंदूंना आवाहनही केले होते. या माध्यमातून मिश्रा यांनी १ कोटी रुपये गोळा केले आहेत.
हिंदु सेनेचे अध्यक्ष आणि भाजपचे माजी नेते हेही जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य !
|
#BreakingNews बीजेपी नेता कपिल मिश्रा को जान से मारने की धमकी मिली।#Udaipur #UdaipurHorror #India @KapilMishra_IND #Delhi @rrakesh_pandey @manideep_shrma pic.twitter.com/hdGWxHRFlN
— News Nation (@NewsNationTV) July 5, 2022
संपादकीय भूमिका
|