नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याप्रकरणी अमरावती येथील ३ जणांना धमकी
एकाकडून तक्रार प्रविष्ट
अमरावती – नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याप्रकरणी येथील ३ जणांना धमकी देण्यात आली आहे. यातील एकाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून दोघांनी या विषयावर बोलण्यास किंवा त्याविषयी तक्रार करण्यास नकार दिला आहे. त्यांना देण्यात आलेल्या धमकीच्या वेळी ‘तो आवाज नेमका कुणाचा होता ?’, ‘अटकेतील आरोपींपैकी कुणी आहे का ?’, आदी माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.