शाळेत मुसलमान विद्यार्थी ७५ टक्के असल्याने इस्लामी नियम लागू करण्यासाठी प्राचार्यांवर दबाव !
गढवा (झारखंड) – झारखंडमधील गढवा येथे शाळेत मुसलमान समुदायाने इस्लामी नियम लागू करण्यासाठी मुख्याध्यापक युगेश राम यांच्यावर दबाव आणला आहे. शाळेत मुसलमान मुले ७५ टक्के, म्हणजे बहुसंख्य असल्याचे कारण पुढे करून मुसलमान तरुणांनी शाळेत घुसून गोंधळ घातला आणि शाळेच्या प्रार्थनेत पालट करण्यास भाग पाडले. तसेच मुलांना हात जोडून प्रार्थना करण्यापासून रोखण्यात आले. मुख्याध्यापकांनी याविषयीची माहिती कोरवाडी पंचायतीचे प्रमुख आणि जिल्हा शिक्षण अधिकारी यांना दिली आहे.
Jharkhand: Muslim community in Garhwa got school prayer changed as 'they are 75% of population', even stopped children from folding hands https://t.co/fnbxwtfLLg
— OpIndia.com (@OpIndia_com) July 5, 2022
शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, ७५ टक्के लोकसंख्येचा संदर्भ देत मुसलमान समाजातील लोक अनेक दिवसांपासून शाळेचे नियम पालटण्यासाठी दबाव आणत होते. काही काळापूर्वी या लोकांनी शाळेतील प्रार्थना करण्याची पद्धत पालटली. पूर्वी ‘दया का दान विद्या का..’ अशी प्रार्थना केली जात होती. आता ‘तूही राम तूही रहीम’ अशी प्रार्थना म्हटली जात आहे.
संपादकीय भूमिका
|