(म्हणे) ‘माझ्यासाठी श्री महाकालीमाता म्हणजे मांसप्रेमी आणि दारूचा स्वीकार करणारी देवी आहे !’
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याकडून ‘काली’ भित्तीपत्रकाचे अश्लाघ्य समर्थन !
कोलकाता (बंगाल) – माझ्यासाठी श्री महाकालीमाता म्हणजे मांसप्रेमी आणि दारूचा स्वीकार करणारी देवी आहे. तुमचे मत वेगळे असू शकते. त्याला माझी काहीच हरकत नाही. देवीची अनेक रूपे आहेत. त्यामुळे कालीच्या या रूपाविषयी मला काहीच अडचण वाटत नाही, अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ‘काली’ या माहितीपटाच्या संदर्भातील भित्तीपत्रकावर देवीच्या वेशभूषेतील अभिनेत्री सिगरेट ओढतांना दाखवल्याचे समर्थन केले आहे. ‘इंडिया टुडे’च्या कार्यक्रमात मोईत्रा बोलत होत्या.
खासदार मोईत्रा म्हणाल्या की, तुम्ही देवाकडे कसे पहाता, हे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही भूतान, सिक्किम येथे गेलात, तर तेथे सकाळी पूजा करतांना देवाला ‘व्हिस्की’ अर्पण केली जाते; मात्र तुम्ही उत्तरप्रदेशात गेला आणि मंदिरात ‘व्हिस्की’ प्रसाद म्हणून दिली, तर तेथील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील. जर तुम्ही तारापीठ येथे गेला, तर कालीमातेच्या मंदिरातील साधू धूम्रपान करतांना दिसतील आणि तेच कालीमातेची पूजा करतात. हिंदू असतांनाही कालीमातेकडे पहाण्याचे मला स्वातंत्र्य आहे आणि ते लोकांनाही असले पाहिजे. तुम्हाला तुमच्या देवतेची तुमच्या इच्छेप्रमाणे पूजा करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. पूजेचा अधिकार वैयक्तिक असला पाहिजे. जोपर्यंत मी तुमच्या क्षेत्रात हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत मला स्वातंत्र्य असले पाहिजे.
देहली, उत्तरप्रदेश आणि मुंबई येथे गुन्हे नोंद
काली मातेला सिगरेट ओढतांनाचे भित्तीपत्रक प्रसिद्ध केल्यावरून नवी देहली, उत्तरप्रदेश आणि मुंबई येथील पोलीस ठाण्यांमध्ये काली माहितीपटाच्या निर्मात्या लीन मणीमेकलई यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|