शिकागो (अमेरिका) येथे स्वातंत्र्यदिनाच्या संचलनावरील गोळीबारात ६ जणांचा मृत्यू, तर ३० जण घायाळ
शिकागो (अमेरिका) – येथे स्वातंत्र्यदिनाच्या संचलनावर करण्यात आलेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू, तर ३० जण घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय रॉबर्ट क्रिमो याला अटक केली असून घटनास्थळावरून रायफल जप्त करण्यात आली आहे.
At least six shot dead at a parade to mark US Independence Day in Chicago, suspect arrested. President #JoeBiden expresses shock over shooting, vows to fight gun violence
— DD News (@DDNewslive) July 5, 2022
अमेरिकेत बंदुकीचा वापर करत होणार्या गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. २४ मे या दिवशी टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात १९ विद्यार्थी आणि २ शिक्षक यांना जीव गमवावा लागला होता, तर न्यूयॉर्कमध्ये १४ मे या दिवशी किराणा दुकानात झालेल्या आक्रमणात १० जणांचा मृत्यू झाला होता. वर्ष २०२२ मध्ये आतापर्यंत सामूहिक गोळीबाराच्या ३०९ घटना घडल्या. यात ११ वर्षांपर्यंतच्या १७९ मुलांचा, तर १२ ते १७ वर्षे वयोगटातील ६७० मुलांचा मृत्यू झाला. वर्ष २०२१ मध्ये अशा ६९३ घटना घडल्या होत्या.