जळगाव येथील कु. मनस्वी नीलेश पाटील आणि कु. तेजल अजय नेवे यांचे इयत्ता १० वीच्या परीक्षेतील यश !

जळगाव – येथील सनातनची साधिका कु. मनस्वी नीलेश पाटील हिला इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९३.४० टक्के आणि कु. तेजल अजय नेवे हिला ८७.२० टक्के गुण मिळाले.

कु. मनस्वी नीलेश पाटील

गुरुकृपेनेच हे शक्य झाले ! – कु. मनस्वी पाटील

गुरुकृपेमुळेच हे शक्य झाले. अभ्यास करण्याआधी मी गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे. परीक्षा प्रारंभ होण्यापूर्वी ‘तुम्हीच माझ्याकडून प्रश्नपत्रिका  सोडवून घ्या आणि येणारे सर्व अडथळे दूर होऊ दे’, अशी प्रार्थना गुरुदेवांना करायचे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसल्यास मी गुरुदेवांना सूक्ष्मातून त्याविषयी विचारायचे, मग ते मला लगेच मार्ग दाखवायचे. त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

कु. तेजल अजय नेवे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच हे यश लाभले ! – कु. तेजल नेवे

परीक्षेच्या आधी एक मास मी सनातनच्या रामनाथी आश्रमात गेले होते. आश्रमातून आल्यानंतर प्रत्येक कृती मी गुरुदेवांसमवेत करत असल्याचा भाव ठेवला. ‘तेच माझ्या समवेत आहेत आणि मी परीक्षा देत आहे’, असा भाव होता. हे यश केवळ गुरुदेवांमुळेच लाभले. गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता !