कोल्हापूर हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा बंदीवान फरार !
मुंबई – हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आणि अभिवचन रजेवर (फर्लोवर) बाहेर पडलेला बंदीवान रवि म्हेत्रे फरार झाला आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाकडून धारावी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
तो वर्ष २००९ पासून एका हत्या प्रकरणात कोल्हापूर कारागृहात शिक्षा भोगत होता. कोरोनामुळे अनेक बंदीवानांना संचित आणि अभिवचन रजेवर सोडण्यात आले. त्यालाही जून २०२१ मध्ये अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते; पण सुट्टी संपूनही तो परत आलेला नाही.
संपादकीय भूमिकारजेवर गेल्यावर बंदीवान फरार होण्याच्या अनेक घटना घडल्या असल्याने त्यांच्यासाठी असलेले हे प्रावधान संयुक्तिक आहे का, याचा पुनर्विचार व्हावा ! |