महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल इंधनांवरील कर अल्प करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राज्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार !

 

एकनाथ शिंदे

मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल इंधनांवरील कर अल्प केला, तशाच प्रकारचा निर्णय आता महाराष्ट्रात घेतला जाईल. पेट्रोल आणि डिझेल या इंधनांवरील कर लवकरच अल्प करण्यात येणार आहे. याविषयी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ४ जुलै या दिवशी केली. विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकल्यावर समारोपीय भाषणात ते बोलत होते. या वेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्यासह रायगड येथील हिरकणी गाव वाचवण्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी संमत करणे आणि ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ करणे अशा घोषणाही केल्या.