सभागृहात विलंबाने पोचल्याने काँग्रेसच्या ५ आमदारांना मतदानापासून मुकावे लागले !
मुंबई – राज्याच्या विधानसभेच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला. विधानसभा अध्यक्षांनी बहुमत ठराव मांडला. या वेळी आमदारांची शिरगणती करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. शिरगणती चालू होण्याआधी २ ‘वॉर्निंग बेल’ देण्यात येतात. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात येतात; मात्र काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह काँग्रेसचे ५ आमदार सभागृहाचे दार बंद झाल्यावर विधानभवनात पोचले. त्यामुळे या आमदारांना बहुमत चाचणीच्या मतदानाला मुकावे लागले. बहुमत चाचणीला वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांना मतदान करता आले नाही.
संपादकीय भूमिकावेळेचे गांभीर्य नसलेले असे लोकप्रतिनिधी जनतेची कामे वेळेवर करत असतील का ? |