पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथील दुकानांतून पाकिस्तानी जिहादी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’साठी गोळा केले जातात पैसे !
गोळा केलेल्या पैशांतून जिहादी आतंकवादी कारवायांसाठी वापर करण्यात येणार असल्याचा अन्वेषण यंत्रणांचा अहवाल !
पीलीभीत (उत्तरप्रदेश) – देशातील वातावरण बिघडवण्यासाठी ५ जिहादी संघटना कार्यरत आहेत, अशी माहिती अन्वेषण यंत्रणांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात देण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातील पीलीभीत येथील मुसलमानांच्या दुकानांमध्ये पैसे साठवण्याच्या डब्यातून वर्गणी गोळा करून जिहादी आतंकवादी कारवायांसाठी पैसे गोळा करण्यात येत आहेत.
हे पैसे ‘दावत-ए-इस्लामी’ संघटनेला देण्यात येत असल्याची माहिती अहवालात अंतर्भूत करण्यात आली आहे. याद्वारे संपूर्ण देशात आतंकवादी कारवाया करण्याचे षड्यंत्र रचण्याची सिद्धता करण्यात आली आहे.
पीलीभीत: बीजेपी MLA प्रवक्तानंद और शहर काजी मौलाना जरताब ने दावत ए इस्लामी को बताया बड़ा खतरा, दुकानों में गुल्लक रख जुटा रहे पैसा
https://t.co/vMe20KirkE— Jansatta (@Jansatta) July 4, 2022
१. दावत-ए-इस्लामी ही संघटना पीलीभीतमध्ये गेल्या काही वर्षांपासून सक्रीय आहे. येथे मदरसे चालवण्यासाठी २५० हून अधिक दुकानांमध्ये पैसे साठवण्याचे डबे ठेवण्यात आले आहेत. त्यावर दावत-ए-इस्लामीसाठी दान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२. भारतात कार्यरत जिहादी संघटना देशातील उत्तर आणि मध्य भारतात अधिक कार्यरत आहेत. यात ५०० हून अधिक प्राध्यापक कार्यरत असून १ सहस्र ५०० व्हॉट्स अॅप गट, फेसबूक, ट्विटर आणि यु ट्यूब यांद्वारे आतंकवादाचा प्रसार करण्यात येत आहे. ‘स्लिपर सेल’ (आतंकवाद्यांना साहाय्य करणारे स्थानिक लोक) बनवण्यात येत आहेत. यात बेरोजगार मुसलमान तरुण- तरुणी यांच्यासह अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थीही सहभागी आहेत.
३. या अहवालात म्हटले आहे की, या वेळी हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर देशातील काही ठिकाणी सुनियोजित पद्धतीने आक्रमणे करण्यात आली. उदयपूर येथे कन्हैयालाल यांच्या हत्येमागे देशात दंगली भडकावण्याचा उद्देश या आतंकवादी संघटनांचा होता.
संपादकीय भूमिकाजिहादी संघटनेसाठी भारतात अशा प्रकारे पैसे गोळा केले जात असतांना सुरक्षायंत्रणांना त्याविषयी माहितीही नसणे, हे लज्जास्पद ! आतंकवादी संघटनेसाठी पैसे मागणारे आणि त्यासाठी पैसे देणारे अशा सर्वांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |