बिजनौर (उत्तरप्रदेश) येथील बाँबस्फोटांच्या प्रकरणी ५ जिहादी आतंकवाद्यांना ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील बिजनौर येथे १२ सप्टेंबर २०१४ या दिवशी झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाने ५ आरोपींना दोषी ठरवून ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हुस्ना, अब्दुल्ला, रईस अहमद, नदीम आणि फुरकान अशी त्यांची नावे आहेत. याच स्फोटातील २ आरोपी असलम अयूब आणि झाकीर बदरूल यांना तेलंगाणा पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. हे दोघे ‘सीमी’ या बंदी घालण्यात आलेल्या आतंकवादी संघटनेचे कार्यकर्ते होते.
बिजनौर ब्लास्ट मामले में लखनऊ में एनआईए की विशेष अदालत ने पांच आरोपियों को दोषी मानते हुए फैसला सुना दिया है-#Bijnor #UttarPradesh https://t.co/4s6joNF2Vc
— ABP Ganga (@AbpGanga) July 3, 2022
संपादकीय भूमिकाअशा आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच जनतेला वाटते ! |