रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय
१. आश्रमातील चैतन्यात वाढ झाली असल्याने पुष्कळ भावजागृती होते !
‘मी आश्रमात काही वर्षांपासून येत आहे. साधकांमधील चैतन्य प्रचंड प्रमाणात वाढले आहे. ‘आपल्या समवेत प्रत्येक क्षणी गुरुदेव आहेत’, असे मला जाणवते. आश्रमातील चैतन्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली.’ – अधिवक्ता निरंजन बी. चौधरी (सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद), जळगाव (१५.६.२०२२)
२. ‘आश्रम पाहून मला मनःशांती मिळाली आणि नवचैतन्यदायी ऊर्जा प्राप्त झाली.’ – अधिवक्ता प्रभाकर वामन भोगले, मुंबई (१४.६.२०२२)
३. ‘आश्रमासारखा आनंद कुठेही पहायला मिळत नाही. मला हा स्वर्गयोग वाटला.’ – अधिवक्ता गजानन दगडू चौगुले, तुळजापूर, जिल्हा धाराशिव. (१५.६.२०२२)