सातारा येथील सनातनचे साधक श्री. चैतन्य लोंढे यांची देहली येथे उच्च शिक्षणासाठी निवड !
सातारा, ३ जुलै (वार्ता.) – येथील सनातनचे साधक सौ. सुलभा आणि श्री. सुनील लोंढे यांचे सुपुत्र श्री. चैतन्य लोंढे हे स्पर्धा परीक्षा गेट AIR 94 (ऑल इंडिया रँक) आणि नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. श्री. चैतन्य यांची उच्च शिक्षणासाठी आयआयटी देहली येथे निवड झाली आहे. त्यांनी सातारा येथील यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयातून शिक्षण घेतले असून M.Sc (Organic Chemistry) परीक्षेत उत्तम गुण प्राप्त केले. यासाठी त्यांना आई-वडील आणि शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. श्री. चैतन्य प्रासंगिक सेवेत सहभागी असतात. ‘हे यश परात्पर गुरु जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो’, असे त्यांनी सांगितले.