पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणार्या राजस्थानामधील तिघांना अटक
जयपूर (राजस्थान) – पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी येथे तिघांना अटक करण्यात आली. हे तिघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना पैशांच्या मोबदल्यात महत्त्वाची संवेदनशील माहिती पुरवत होते.
१. श्रीगंगानगर, हनुमानगड आणि चुरू या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ‘ऑपरेशन हिफाजत’ अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण २३ संशयितांची संयुक्तपणे चौकशी करण्यात आली होती.
२. या चौकशीमध्ये हनुमानगढ येथील अब्दुल सत्तार, श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगड येथील नितीन यादव आणि चुरू येथील राम सिंह हे तिघेजण सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे आढळून आले.
३. अब्दुल सत्तार वर्ष २०१० पासून नियमितपणे पाकिस्तानात जात होता. तो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा स्थानिक हस्तक म्हणून काम करत होता. तो पाकिस्तानी लोकांच्या सतत संपर्कात होता आणि देशातील महत्त्वाच्या ठिकाणांची छायाचित्रे पाठवत होता.
४. नितीन यादव याने पाकिस्तानी महिला हस्तकाच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून सैन्याविषयीची माहिती पुरवली. त्याद्वारे तो पैसे मिळवत होता.
संपादकीय भूमिकाअशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! |