देशातील ७६७ लाख हेक्टर वनभूमी पैकी १३.३५ लाख हेक्टर भूमी भूमाफियांच्या कह्यात !
नवी देहली – देशात ७६७ लाख हेक्टर वनभूमी पैकी १३.३५ लाख हेक्टर भूमी भूमाफियांच्या कह्यात असल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेश राज्यात सर्वाधिक ५.४१ लाख हेक्टर वनभूमीवर अतिक्रमण झाले आहे. राजस्थानमध्ये १० सहस्र ८४० हेक्टर भूमी अतिक्रमित आहे. ‘राजस्थान पीपल फॉर अॅनिमल्स’चे बाबूलाल जाजू यांना माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मिळवली.
मध्यप्रदेशच्या खालोखाल आसाममधील ३.६३ लाख हेक्टर भूमी, अरुणाचल प्रदेशमधील ०.५३ लाख हेक्टर, आंध्रप्रदेशमधील ०.३४ लाख हेक्टर, तर राजस्थानमधील ०.१० लाख हेक्टर भूमी भूमाफियांच्या कह्यात आहे.
भाडेकरार संपूनही भूमी वन विभागाच्या कह्यात नाहीत !
काही वनभूमींचे भाडेकरार संपूनही त्या भूमी वन विभागाला परत करण्यात आलेल्या नाहीत. यावर सुस्त शासकीय यंत्रणांकडून अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. राज्य सरकारेही अवैध धंदे बंद करण्यासाठी कठोर पाऊले उचलत नाहीत. काही प्रकरणे न्यायालयात आहेत. वनसंरक्षकांना अधिकार आहेत; मात्र ते फारशी कारवाई करत नाहीत.
संपादकीय भूमिका
|