विधानसभा अध्यक्षपदासाठी मविआकडून राजन साळवी यांचे नाव निश्चित !
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून रिक्त असणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजपचे आमदार राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होईल. राजन साळवी शिवसेनेचे सदस्य असून ते राजापूर (जिल्हा रत्नागिरी) विधानसभा मतदारसंघातून विद्यमान विधानसभेचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेवर वर्ष २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सलग ३ वेळा निवडून आले आहेत.