गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या ठिकाणी लावायच्या प्रदर्शनाच्या फलकांची सूची उपलब्ध !
साधकांसाठी सूचना !
गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या ठिकाणी आपण प्रतिवर्षी फलकांचे प्रदर्शन लावतो. या वर्षी उपस्थित जिज्ञासूंना सनातन संस्था आणि तिच्यासमवेत कार्यरत समविचारी संस्था यांच्या कार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने एकूण ४३ फ्लेक्स फलक उपलब्ध करण्यात येत आहेत. या फलकांमध्ये साधना, धर्मशिक्षण, सनातनची ग्रंथसंपदा, ‘सनातन प्रभात’, सनातनची उत्पादने, धर्मजागृती, हिंदु राष्ट्र आदींविषयी माहिती देण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमस्थळी उपलब्ध जागेनुसार आणि फलकांच्या सूचीतील प्राधान्यक्रमानुसार फलकप्रदर्शन लावता येईल.
प्रदर्शनात लावायच्या फलकांची सूची (एक्सेल धारिका) नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. सभागृहाच्या आकारमानानुसार एकूण फलकांची निवड करावी. उत्तरदायी साधकांनी जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार फलक छापून घ्यावेत.
टीप : सूचीतील फलकांपैकी काही फलक जिल्ह्यात पूर्वी छापलेले असल्यास वेगळे फलक छपाई न करता उपलब्ध फलकांचा प्राधान्याने वापर करावा.