साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !
रामनाथी, गोवा येथील चैतन्यदायी सनातन आश्रमात सेवानंद अनुभवण्याची अमूल्य संधी !
अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती केलेल्या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !
‘रामनाथी येथील सनातनचा आश्रम म्हणजे चैतन्याचा स्रोत ! रामनाथी आश्रमात आल्यामुळे केवळ साधकांनाच नव्हे, तर वाचक, हितचिंतक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनाही साधनेत मार्गदर्शन मिळते. त्यामुळे ठिकठिकाणांहून अनेक जण आश्रमभेटीसाठी येतात. सध्या पूर्णवेळ साधनेसाठी रामनाथी आश्रमात येणाऱ्या साधकांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) विविध सेवांसाठी साधकसंख्या अपुरी पडत आहे.
अन्नपूर्णा कक्षातील विविध सेवा करण्यासाठी शारीरिक क्षमता असलेल्या स्त्री आणि पुरुष साधकांची आवश्यकता आहे. इच्छुक साधक पूर्णवेळ अथवा काही कालावधीसाठी आश्रमात राहून या संधीचा लाभ घेऊ शकतात. ही सेवा करू शकणाऱ्या किंवा शिकून घेण्याची सिद्धता असलेल्या साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून खाली दिलेल्या सारणीनुसार स्वतःची माहिती खालील पत्त्यावर पाठवावी.
नाव : सौ. भाग्यश्री सावंत
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’