पेठेतील (बाजारातील) एका प्रसिद्ध टूथपेस्टपेक्षा ‘सनातन दंतमंजन’मधून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘टूथपेस्ट’ आणि ‘टुथब्रश’ यांचा उपयोग करून दात घासण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. पूर्वीचे लोक कडुलिंबाच्या काड्यांचा दातवण म्हणून वापर करून दात घासत. त्यामुळे दात चांगल्या प्रकारे स्वच्छ होत, तसेच कडुलिंबातील रस आणि चैतन्य यांचा लाभ हिरड्या अन् दात यांना होऊन ते बळकट होत.
‘सनातन संस्थे’च्या वतीने दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंची निर्मिती करण्यात येते, उदा. अंगाला लावायचा साबण, केशतेल, उटणे, दंतमंजन इत्यादी. दैनंदिन उपयोगातील वस्तू सात्त्विक असण्यासह त्यांचा उपयोग करण्याची पद्धत सात्त्विक असल्यास दैनंदिन कृतीतून आध्यात्मिक स्तरावरील लाभ व्यक्तीला मिळतात. यासाठी ‘सनातन संस्था’ सात्त्विक उत्पादनांची निर्मिती करण्यासह ते वापरण्याची सात्त्विक पद्धत याविषयीही मार्गदर्शन करते.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘सनातन दंतमंजन’ आणि पेठेतील एक प्रसिद्ध टूथपेस्ट यांतून प्रक्षेपित होणाऱ्या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणे आणि त्यांचे विश्लेषण पुढे दिले आहे.
१. पेठेतील (बाजारातील) एका प्रसिद्ध टूथपेस्टमधून नकारात्मक स्पंदने आणि ‘सनातन दंतमंजन’मधून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे
१ अ. वस्तूमधून प्रक्षेपित होणारी स्पंदने अनेक घटकांवर अवलंबून असणे : एखाद्या वस्तूमधून प्रक्षेपित होणारी स्पंदने अनेक घटकांवर अवलंबूत असतात, उदा. वस्तूचा प्रकार, तिच्या निर्मितीचा उद्देश, निर्मितीचे ठिकाण, वस्तू बनवण्यासाठी वापरलेले घटकपदार्थ इत्यादी. हे घटक जितके सात्त्विक असतील तेवढी त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. याउलट घटक असात्त्विक असल्यास त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात.
१ आ. पेठेतील एका प्रसिद्ध टूथपेस्टमधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : या चाचणीतील पेठेतील टूथपेस्टमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून आली. ही टूथपेस्ट वापरणाऱ्यांना तिच्यातील नकारात्मक स्पंदनांमुळे आध्यात्मिक स्तरावर हानी होते. टूथपेस्टने दात घासण्यासाठी टुथब्रशचा वापर होत असल्याने हानीचे प्रमाण वाढते. याचे कारण हे की, ‘ब्रशचे केस कृत्रिम असल्यामुळे त्यांतून रज-तम कणांचे प्रक्षेपण होते. ब्रशच्या केसांच्या स्पर्शामुळे हिरड्या आणि दात यांवर रज-तम लहरींचे आवरण निर्माण होते. त्यामुळे दात केवळ स्थुलातून स्वच्छ होतात; परंतु सूक्ष्मातून ते अस्वच्छच असतात.’ – कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (सूक्ष्मातून प्राप्त ज्ञान २८.११.२००७)
१ इ. ‘सनातन दंतमंजन’मधून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : ‘सनातन दंतमंजन’मध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली. ‘सनातन दंतमंजन’ वापरणाऱ्यांना त्यातील सात्त्विकतेचा लाभ होतो. तसेच दात बोटाने (अनामिकेने) घासल्याने लाभ वृद्धींगत होतो. याचे कारण हे की, बोटाने दात घासल्यावर देहातील चांगल्या शक्तीचे बोटाच्या पेरातून प्रक्षेपण होऊन हिरड्यांमध्ये संक्रमण होते. या प्रक्रियेमुळे हिरड्या आणि दात यांना सात्त्विकतेचा लाभ होतो. त्यामुळे दात स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही स्वच्छ होतात.
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (सूक्ष्मातून प्राप्त ज्ञान २८.११.२००७)
१ ई. सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांशी संबंधित घटक सात्त्विक असल्याने त्यातून सात्त्विकता प्रक्षेपित होणे : सनातन-निर्मित उत्पादने सात्त्विक बनावी, तसेच ती वापरणाऱ्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ मिळावेत, हे प्रधान उद्देश ठेवून त्यांची निर्मिती करण्यात येते. वस्तूच्या निर्मितीपासून ते त्यांचे वितरण करण्यापर्यंतची प्रत्येक कृती साधक त्यांची ‘साधना’ म्हणून करतात. ‘सनातनच्या उत्पादनांतून साधक अन् समाज यांना सात्त्विकता मिळावी’, यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत आहे. एकूणच सनातन-निर्मित उत्पादनांशी संबंधित घटक सात्त्विक असल्याने त्यातून सात्त्विकता प्रक्षेपित होते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.५.२०२१)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
‘सनातन दंतमंजन’चे औषधी उपयोग, त्याची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता१. सनातन दंतमंजनाचे औषधी उपयोगसनातन दंतमंजनाच्या नियमित वापराने हिरड्या आणि दात यांचा दुर्बलपणा दूर होऊन हिरड्या आणि दात बळकट होतात. हिरड्या सुजणे, त्यातून पू आणि रक्त येणे बंद होते. दात किडणे थांबून दातांचे आरोग्य सुधारते, तसेच दात मुळापासून घट्ट होतात. २. सनातन दंतमंजनाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपयुक्ततासनातन दंतमंजनाच्या संदर्भात सनातनच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेले ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण’ आणि त्या वेळी त्यांच्या मनात आलेले विचार पुढे दिले आहेत. त्यावरून सनातन दंतमंजनाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता लक्षात येईल. २ अ. सनातन दंतमंजनाचे ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण’ २ अ १. दंतमंजन पाहून प्रसन्न वाटणे : दंतमंजन पाहून सुगंधी उटण्याला पाहून जसे प्रसन्न वाटते, तसे प्रसन्न वाटले. देवत्व असलेल्या गोष्टीत दैवी सुगंधाचे प्रमाण जास्त असल्याने या सुगंधाचा स्पर्श थेट अंतर्मनाला होऊन ती वस्तू पाहून प्रसन्न वाटते. २ अ २. दंतमंजन हातात घेतल्यावर हाताला थंडावा जाणवणे : दंतमंजन हातात घेतल्यावर हाताला थंडावा जाणवला. जो घटक ईश्वराच्या संकल्पशक्तीने निर्माण झालेला असतो, त्यात चैतन्य असल्याने त्याचा स्पर्श हाताला थंड जाणवतो. – संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’ (सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील लिंक : https://www.sanatan.org/mr/a/1253.html) |