हिंदूंच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून प्रशासनाला निवेदने !
मुंबई – उदयपूर येथील कन्हैयालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. हिंदूंच्या नृशंस हत्या करणार्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुंबई जिल्हाधिकार्यांसह ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर आणि अंबरनाथ तहसीलदार यांच्या माध्यमातून भारत सरकारला निवेदने दिली. मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उल्हासनगरचे नायब तहसीलदार गणपत शिंगाडे आणि अंबरनाथ तहसीलदार प्रशांती माने यांना निवेदने देण्यात आली.
‘केवळ हत्येतील दोषींचा शोध न घेता हत्या करणार्यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत’, अशी मागणी केली. यांसह सरकारने मदरशांना निधी देणे बंद करावे, तसेच आतंकवादाचे प्रशिक्षण देणारे मदरसे त्वरित बंद करावेत, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या.